आमदार विनय कोरे यांच्यासह विविध मान्यवरांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट !

आमदार श्री. विनय कोरे यांना पंचांग भेट देतांना त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे समवेत श्री. मनोज खाडये

कोल्हापूर, २२ सप्टेंबर (वार्ता.) – पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघातील आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष श्री. विनय कोरे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे त्वचारोगतज्ञ मानसिंग शिंदे, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट, सदस्य श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे कोकण तथा गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांसह अन्य उपस्थित होते. याचसमवेत मलकापूर येथील उपनगराध्यक्ष श्री. भारत गांधी आणि माजी नगरसेवक श्री. जितेंद्र वळीवडेकर यांनाही पंचांग भेट देण्यात आले.

आमदार विनय कोरे यांचे स्वीय साहाय्यक विश्वास जाधव (डावीकडे) यांना पंचांग भेट देतांना त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे आणि श्री. बाबासाहेब भोपळे
मलकापूरचे उपनगराध्यक्ष श्री. भारत गांधी (डावीकडून दुसरे) यांना पंचांग भेट देतांना त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे आणि माजी नगरसेवक जितेंद्र वळीवडेकर (डावीकडून तिसरे) यांना पंचांग भेट देतांना श्री. भोपळे (उजवीकडे)