‘साधकांनो, आध्यात्मिक उन्नती जलद होण्यासाठी परिपूर्ण सेवा करा !’
दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा साधना म्हणून होण्यासाठी आमचे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला गेली २३ वर्षे अव्याहतपणे मार्गदर्शन करत आहेत. सध्या त्यांना अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही ते बारकाव्यांनिशी दैनिक वाचतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २० मे २०२१ पासून दैनिकातील अनेक चुका लक्षात आणून देण्यास प्रारंभ केला. शुद्धलेखन आणि व्याकरण यांसंदर्भातील अशा लहान लहान चुकांमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधकांच्या साधनेची हानी झाली.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/511725.html
साधनेसाठी हानीकारक ठरलेल्या चुकांचे स्वरूप साधकांना लक्षात यावे. साधकांना दैनिकाच्या पृष्ठांची संरचना करतांना झालेल्या चुका लक्षात याव्यात आणि स्वतःच्या लिखाणाच्या सेवेत अशा प्रकारच्या लहान लहान चुकांचे निरीक्षण करण्याची दृष्टी निर्माण व्हावी, यासाठी ही सारणी येथे प्रसिद्ध करत आहोत.
– श्री. भूषण केरकर (६७ टक्के आध्यात्मिक पातळी), सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके (१३.८.२०२१)