एखाद्या चुकीसाठी सर्वांना एकसारखी शिक्षा असली, तरी व्यक्तीनुरूप प्रायश्चित्त पालटण्याचे कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले

शिक्षा

‘एखाद्याकडून चूक झाल्यावर ‘त्याने ती चूक पुन्हा करू नये’, याची जाणीव त्याच्यात निर्माण होण्यासाठी आणि त्या चुकीमुळे त्याच्याकडून झालेल्या पापाचे निरसन व्हावे, यासाठी करावयास सांगितलेली कृती म्हणजे ‘शिक्षा’. त्यामुळे एकाच प्रकारची चूक करणार्‍या सर्वांना सारखीच शिक्षा असते.

प्रायश्चित्त

एखाद्याकडून चूक झाल्यास, काही वेळा त्याला त्या चुकीची जाणीव झालेली असते, तसेच त्याला ती ‘चूक झाल्याची खंतही असते.’ त्यामुळे त्याने त्या चुकीमुळे झालेल्या पापाचे परिमार्जन करण्यासाठी स्वतः केलेली कृती म्हणजे ‘प्रायश्चित्त’ होय. व्यक्तीपरत्वे चुकीच्या दुष्परिणामांची जाणीव, दोषांची तीव्रता, चूक होण्याची वारंवारता, चूक झाल्यावर वाटणारी खंत, यापूर्वी सारख्याच प्रकारच्या चुकीसाठी जरी प्रायश्चित्त घेतले असले, तरी त्याचा परिणाम किती झाला ? यांसारख्या विविध घटकांवर प्रायश्चित्ताची तीव्रता अवलंबून असते. त्यामुळे चूक एकच असली, तरी प्रायश्चित्त हे व्यक्तीनुरूप आणि काळानुसार पालटते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.८.२०२१)