रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर सौ. उषा अंबिलवादे यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. एका संतांच्या भेटीच्या वेळी आलेल्या अनुभूती
१ अ. एका संतांच्या सत्संगासाठी गेल्यावर तेथे थंडावा जाणवणे आणि मनात आनंदाच्या उकळ्या फुटणे : एका संतांच्या सत्संगासाठी गेल्यावर तेथे मला थंडावा जाणवला. त्या वेळी माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आणि माझे मन स्थिर होते.
१ आ. संत बोलत असतांना वातावरणात सर्वत्र चैतन्य पसरले होते. त्या वेळी माझे मन निर्विचार झाले होते.
१ इ. श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतांना काळ जसा थांबला होता, तसे संतांच्या भेटीत मला जाणवत होते.
१ ई. ‘आता दुसरे काही नको. केवळ त्यांचे चरण पाहिजेत’, असे वाटून माझा भाव जागृत झाला.
२. ‘आश्रम पहातांना ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेने येथे छोटे हिंदु राष्ट्रच निर्माण झाले आहे’, असे मला वाटले आणि त्या वेळी माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. ’
– सौ. उषा अंबिलवादे, अंबड, संभाजीनगर. (५.३.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |