भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या तटावर पाकिस्तानी जहाज पकडले १२ जणांना अटक

शत्रूराष्ट्राचे सैनिक, आतंकवादी, नागरिक आदी घुसखोरी करू धजावणार नाहीत, अशी पत भारताने स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांत निर्माण न केल्याचाच हा परिणाम ! सरकारने आतातरी अशी पत निर्माण करण्यासाठी पावले उचलावीत ! – संपादक

नवी देहली – भारतीय तटरक्षक दलाने भारतीय सीमेत घुसखोरी केलेले ‘अल्लाह पवाकल’ नावाचे पाकिस्तानी जहाज गुजरातच्या तटावर पकडले. या वेळी या जहाजावरील १२ जणांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे.