साकीनाका घटनेतील आरोपीला लवकर फाशी द्या ! – भाजप महिला शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

मुंबई – महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महिलांवरील वाढते निर्घृण अत्याचार, गुन्हेगारांचे वाढते मनोबल, तसेच महिलांच्या मनातील वाढती असुरक्षितता याविषयी मुंबई भाजपच्या महिलांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची  भेट घेतली. साकीनाका येथे झालेल्या निर्घृण गुन्ह्यातील आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे शिष्टमंडळाने कोश्यारी यांच्याकडे केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. ‘राज्य सरकारने विशेष विधानसभा सत्र आयोजित करून ‘शक्ती’ कायदा लवकर संमत करावा’, ‘भाजपा शासन काळात कार्यान्वित केलेली सीसीटीव्ही कार्यप्रणाली अधिक बळकट केली जावी’ आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.