हिंदु संस्कृतीने विश्वबंधुत्वाचा, तर आतंकवादी आक्रमण करणार्‍यांच्या संस्कृतीने विश्व विध्वंसाचा संदेश दिला ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, लेखक आणि हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदू जनजागृती समिति

‘हिंदुत्व हाच विश्वबंधुत्वाचा खरा आधार’ या विषयावर ‘ऑनलाईन विशेष संवाद’ !

डॉ. सच्चिदानंद शेवडे

पुणे – १२८ वर्षांपूर्वी ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी अमेरिकेत शिकागो येथे ‘सर्वधर्म परिषद’ झाली. ही परिषद सर्वधर्मीय नसून ती ख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी आयोजित केली होती, हे स्वामी विवेकानंद यांच्या लक्षात आले होते. त्या परिषदेत स्वामींची ६ भाषणे झाली. या भाषणांच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांनी हिंदु धर्मावर टीका करणार्‍यांना सडेतोड उत्तरे दिली. त्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांनी ‘हिंदु संस्कृतीत विश्वबंधुत्वाचा संदेश दिला जातो’, हे दाखवून दिले, तर त्याच अमेरिकेत २० वर्षांपूर्वी ११ सप्टेंबर २००१ या दिवशी धर्मांधांनी आतंकवादी आक्रमण केल्यावर ‘अन्य संस्कृती विश्व विध्वंसाचा संदेश देणारी आहे’, हे समोर आले. हा दोन्ही संस्कृतींमधील भेद आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक आणि हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ सप्टेंबरला आयोजित केलेल्या ‘हिंदुत्व हाच विश्वबंधुत्वाचा खरा आधार’ या विषयावरील ‘ऑनलाईन विशेष संवादा’त ते बोलत होते. सनातन संस्थेच्या कु. कृतिका खत्री यांनी डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला.

कु. कृतिका खत्री

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी मांडलेली अन्य सूत्रे

हिंदु धर्म विश्वबंधुत्वाची प्रेरणा देणारा !

जगभरातील ८५ आतंकवादी आणि नक्षलवादी संघटना प्रामुख्याने इस्लामी, ख्रिस्ती अन् साम्यवादी विचारधारेच्या आहेत. यात एकही हिंदु संघटना नाही. जगातील चौथी सर्वांत मोठी लोकसंख्या हिंदूंची आहे. काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना विस्थापित केल्यावर त्यातील एकही व्यक्ती आतंकवादी झाली नाही; कारण हिंदू सहिष्णु आहेत. ‘संघर्ष नको, सहकार्य हवे’, ‘नाश नको, स्वीकार हवा’ आणि ‘विसंवाद नको, संवाद हवा’, या त्रिसूत्रीच्या आधारे हिंदु धर्म विश्वबंधुत्वाची प्रेरणा देतो

अन्य धर्मियांच्या विरोधात परिषद घेण्याचे धाडस डाव्यांमध्ये आहे का ?

हिंदु धर्म विश्वबंधुत्वाचे आचरण आणि शिकवण देत असतांना आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदु धर्माच्या विरोधात ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषद आयोजित केली जात आहे. या परिषदेत हिंदु धर्माचा अभ्यास असणारा एकही वक्ता नाही. ही परिषद डाव्यांची आहे. अशी परिषद ते हिंदूंच्या विरोधात घेऊ शकतात, यातून हिंदू सहिष्णु आहेत, हेच सिद्ध होते. अन्य धर्मियांच्या विरोधात अशी परिषद घेण्याचे धाडस डाव्यांमध्ये आहे का ? हिंदुविरोधी परिषदेमुळे हिंदु समाज हा आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटित होत आहे.

वैचारिकता आणि लोकशाही यांचा उपदेश देणार्‍या डाव्यांच्या देशांत लोकशाही आहे का ?

डाव्यांना केवळ वाद निर्माण करण्याची सवय आहे. त्यांना वादाचे निवारण करता येत नाही. त्यामुळे रशियासारख्या मोठ्या देशाचे तुकडे-तुकडे झाले. अनेकांचा आवाज दाबणार्‍या चीनचेही उद्या तुकडे-तुकडे होण्याची शक्यता आहे. इतरांना वैचारिकता आणि लोकशाही यांचा उपदेश देणार्‍या डाव्यांच्या देशांत लोकशाही कुठे आहे ?