अमेरिकेकडून अफगाणिस्तानला ४ सहस्र ७१४ कोटी रुपयांच्या साहाय्यतेची घोषणा

अमेरिकेची गांधीगिरी ! हे म्हणजे सापाला दूध पाजण्यासारखे आहे ! मानवतेच्या नावाखाली देण्यात येणारी ही रक्कम गरीब अफगाणी नागरिकांना मिळणार कि तालिबानी आतंकवादी ती स्वतःसाठी खर्च करणार, यावर कोण आणि कसे लक्ष ठेवणार ? यापूर्वी अमेरिकेने अशा प्रकारचे साहाय्य पाकला केले होते आणि पाकने ते जिहादी आतंकवाद्यांवर खर्च केल्याचा इतिहास आहे ! – संपादक

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेकडून अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी ४ सहस्र ७१४ कोटी रुपयांच्या साहाय्यतेची घोषणा करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेचे राजदूत लिंडा थॉम्पसन-ग्रीनफिल्ड यांनी ‘हे आर्थिक साहाय्य मानवीय दृष्टीकोनातून देणार आहोत’, असे म्हटले आहे. ‘अफगाणिस्तानमधील परिस्थिती लक्षात घेता भविष्यात आणखी साहाय्य देण्यावरही विचार केला जाऊ शकतो’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी चीननेदेखील अफगाणिस्तानला २ सहस्र २८३ कोटी रुपयांचे साहाय्य देण्याची घोषणा केली होती. यामध्ये अन्नधान्य आणि कोरोना लशीचाही समावेश आहे. चीनने अफगाणिस्तानला केलेल्या साहाय्याचा हा पहिला टप्पा असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.