धर्मांधाने अपहरण केलेल्या अल्पवयीन हिंदु मुलीची सुटका करण्याच्या प्रकरणात पोलिसांविषयी आलेले कटू अनुभव
‘एका राज्यातील एका शहरात धर्मांध व्यक्तीने एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण केले. ‘लव्ह जिहाद’च्या या प्रकरणात पीडित हिंदु मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी त्यांना साहाय्य करण्याऐवजी अन्वेषण करण्यास टाळाटाळ करून एक प्रकारे ‘लव्ह जिहाद’लाच खतपाणी घातले. या प्रकरणात पोलिसांनी पीडित हिंदु मुलीला तत्परतेने शोधून काढले तर नाहीच; पण धर्मांधांविरुद्ध ‘पॉक्सो’ (Protection Of Children from Sexual Abuse, बाललैंगिक शोषण प्रतिबंधक) कायद्याच्या अंतर्गत साधा गुन्हाही नोंद केला नाही. उलट ‘सदर मुलगी स्वतःहूनच धर्मांधांसह पळून गेली’, असे धादांत खोटे सांगून प्रकरणाचे गांभीर्य अल्प करण्याचा, तसेच स्वतःचे दायित्व झटकण्याचा संतापजनक प्रयत्न केला. एकूणच या सर्व घटनाक्रमात पीडित हिंदु मुलीच्या कुटुंबियांना पोलिसांविषयी आलेला कटू अनुभव येथे देत आहोत.
१. अपहरण झालेल्या मुलीच्या नातेवाइकांना अपहरणकर्त्यांचा पत्ता देऊन मुलीला घेऊन येण्यास पोलिसांनी सांगणे
अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी मुलीच्या पालकांनी एका धर्मांधावर संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी त्या धर्मांधाचा ठावठिकाणा शोधला; मात्र स्वतः जाऊन कारवाई करण्याऐवजी मुलीच्या नातेवाइकांनाच पत्ता सांगून तेथून मुलीला घेऊन येण्यास सांगितले. मुलीचे असाहाय्य नातेवाइक पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी गेले; मात्र संंबंधित व्यक्तीने मुलगी तेथे असल्याचे नाकारले आणि नातेवाइकांना परत पाठवले.
स्वतःचे दायित्व झटकणार्या पोलिसांचा जनतेला आधार वाटेल का ? अपहरणकर्ते पोलिसांना दाद देतील कि सर्वसामान्य नागरिकांना ? ‘अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या प्रकरणी संशयित वाटणार्या व्यक्तीकडे चौकशी केल्यावर ‘मुलगी आमच्याकडे आहे’, असे अपहरणकर्ते सांगतील आणि मुलगी नातेवाईकांना परत देतील’, या पोलिसांच्या समजुतीला भाबडा आशावाद म्हणायचे कि सामान्यज्ञानाचा अभाव, असा प्रश्न कुणालाही पडेल !
२. मुलीच्या कुटुंबियांनी निवेदन दिल्यानंतरही पोलिसांनी त्यांनाच मुलीला शोधून आणण्यास सांगणे
या संदर्भात काही दिवसांनी मुलीच्या कुटुंबियांनी परत पोलीस ठाण्यामध्ये जाऊन धर्मांधाला शोधण्यासंदर्भात आवेदन दिले आणि अन्य एका धर्मांधावर संशय व्यक्त केला. त्यावर अन्वेषणाला गती देण्याऐवजी पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांनाच ‘एका वाहनाची सोय करा आणि तुम्ही मुलीला घेऊन या’, असे सांगितले. ‘आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्हीही प्रयत्न करा’, असे सांगून मुलीच्या कुटुंबियांची बोळवण केली.
वास्तविक आरोपीला बेड्या ठोकण्यासाठी जायला पोलिसांकडे वाहन नाही का ? जर मुलीचा शोध कुटुंबियांनीच घ्यायचा असेल, तिथेपर्यंत पोचण्यासाठी कुटुंबियांनीच प्रयत्न करायचे असतील, तर पोलिसांचे काय काम ? अशा कामचुकार पोलिसांमुळेच पोलीसदल अपकीर्त होत आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
३. हिंदुत्वनिष्ठ संघटनेने वरिष्ठ पोलिसांकडे या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतरही पोलिसांनी वाहनाची सोय करण्यास मुलीच्या कुटुंबियांनाच सांगणे
पोलिसांकडून न्याय मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने मुलीच्या कुटुंबियांनी एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेकडे अडचण मांडली. संघटनेच्या एका कार्यकर्त्याने सामाजिक माध्यमांद्वारे वरिष्ठ पोलिसांकडे या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर स्थानिक पोलीस सक्रीय झाले; मात्र त्यांनी पुन्हा वाहनाची सोय करण्याची मागणी कुटुंबियांकडेच केली.
४. पुन्हा एकदा निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी सूत्रे हातात घेऊन आरोपीला शोधून काढणे
धर्मांधाचे त्या वेळच्या वास्तव्याचे ठिकाण मुलीच्या गावापासून १ सहस्र किलोमीटर दूर होते. तेथे जाण्यासाठी वाहनाची सोय करण्याची कुटुंबियांची आर्थिक क्षमता नसल्याविषयी आवेदन दिल्यानंतर वरिष्ठ पोलिसांनी सूत्रे हातात घेतली. पोलिसांचे २ गट बनवून धर्मांध आरोपीला शोधून काढले आणि अल्पवयीन मुलीची धर्मांधाच्या कचाट्यातून सुटका केली. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे.
५. मुलीचे अपहरण झालेले असतांनाही पोलिसांनी तपास टाळण्यासाठी खोटे बोलणे
सर्वांत गंभीर सूत्र म्हणजे, ‘हे प्रकरण वाढू नये, म्हणून मुलगी आपणहून मुलासमवेत गेली होती’, असे पोलिसांनी सांगितले. वास्तविक अल्पवयीन मुलगी धर्मांधासह पळून गेल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी धर्मांधाविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तत्परतेने अन्वेषण करणे अपेक्षित होते. सज्ञान नसलेली कोणतीही मुलगी स्वतःचा निर्णय घेण्यास सक्षम नसते. अशा वेळी अल्पवयीन मुलगी स्वतःहूनच पळून गेल्याचे वक्तव्य करणे, याला पोलिसांचे कायद्याविषयीचे अज्ञान म्हणायचे कि पराकोटीची असंवेदनशीलता ? पोलिसांच्या अशा वृत्तीने जनतेला कधीतरी पोलिसांचा आधार वाटेल का ? ही स्थिती पालटण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत.’
– एक धर्मप्रेमी
साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !
पोलीस आणि प्रशासन यांच्या संदर्भात येणारे कटू अनुभव कळवा !पोलीस-प्रशासन यांच्याविषयी कटू अनुभव आले असल्यास ते पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर, द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. संपर्क क्रमांक : 9595984844 ई-मेल : [email protected] |