अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्यापूर्वीच तालिबानमध्ये गटबाजी !

(डावीकडून) सिराजुद्दीन हक्कानी, हिब्तुल्लाह अखुंदजादा आणि मुल्ला अब्दुल गनी बरादर

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्यापूर्वीज तालिबानमधील गटबाजी समोर येऊ लागली आहे. मुल्ला (इस्लामी विद्वान) अब्दुल गनी बरादर, हिब्तुल्लाह अखुंदजादा आणि सिराजुद्दीन हक्कानी यांच्यात गटबाजी चालू असल्याचे वृत्त आहे. त्यात मुल्ला बरादर आणि सिराजुद्दीन हक्कानी यांच्यात ती अधिक तीव्र असल्याचे सांगितले जात आहे.

१. वर्ष १९९४ मध्ये तालिबानच्या स्थापनेतील ४ प्रमुख नेत्यांमध्ये बरादर याचा समावेश होता. वर्ष २००१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानमधील तालिबानची सत्ता उलथवून टाकल्यावर बरादरच त्याच्या विरोधात लढणार्‍यांपैकी मोठा नेता होता. बरादर सध्या सरकारमध्ये अल्पसंख्यांकांनाही सहभागी करण्याच्या मताचा आहे.

२. दुसरीकडे हक्कानी नेटवर्कचा नेता सिराजुद्दीन हक्कानी अन्य कुणालाही सत्तेत सहभागी करण्याच्या विरोधात आहे. तालिबानसमवेत असूनही त्याची स्वतंत्र आतंकवादी संघटना आहे. त्याला पाकचेही समर्थन आहे.