सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ६ ते ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे.
अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्क रहाण्याची आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सूचना देण्यात आली आहे. अतीवृष्टीच्या अनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची माहिती त्वरित जिल्हा नियंत्रण कक्षाला ०२३६२-२२८८४७ या संपर्क क्रमांकावर उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी साठे यांनी केले आहे.