परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धर्मसत्संगांच्या चित्रीकरणाच्या वेळी सौंदर्यवर्धन सेवेविषयी सांगितलेली सूत्रे
१. ‘धर्मसत्संगाचे निवेदन करणार्या निवेदकाचे कपडे आणि अलंकार हे निवेदक अन् निवेदनात सांगितला जाणारा विषय यांना साजेसे असावेत, उदा. सण-उत्सवाचा विषय असेल, तर एकापेक्षा दोन अलंकार घातलेले बरे दिसतात, तसेच निवेदिकेने एकदम साधी साडी न नेसता काठापदराची नेसावी.
२. निवेदकापेक्षा त्याची वेशभूषा (पोशाख) उठून दिसू नये; कारण निवेदन चालू असतांना त्यातील विषय महत्त्वाचा असतो. धर्मसत्संग चालू असतांना पहाणार्याचे लक्ष विषयाकडेच राहिले पाहिजे. ‘निवेदकाची वेशभूषा गडद असेल, तर श्रोत्यांचे लक्ष निवेदक सांगत असलेल्या विषयाकडे अल्प आणि निवेदकाच्या वेशभूषेकडेच अधिक जाऊ शकते.
३. धर्मसत्संगात निवेदकाची केशभूषा, वेशभूषा आणि अलंकार सात्त्विक असणे महत्त्वाचे असते.
परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक सेवा परिपूर्ण होण्यासाठी अनेक लहान लहान विशेष सूत्रे (बारकावे) सांगतात. त्या मागे त्यांचा ‘समाजापर्यंत पोचणारा विषय आदर्श असावा’, हा व्यापक विचार असतो.’
– सौ. साक्षी जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.६.२०२०)