देहलीमध्ये आतंकवादी आक्रमणाच्या शक्यतेने इस्रायलच्या दूतावासाची सुरक्षा वाढवली

नवी देहली – येथे जिहादी आतंकवाद्यांकडून आक्रमण होण्याच्या शक्यतेने इस्रायलच्या दूतावासाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे ही खबरदारी घेण्यात आली आहे. ६ सप्टेंबरला इस्रायली लोक नववर्षाचे स्वागत करतात. त्या पार्श्‍वभूमीवर आक्रमणाच्या शक्यतेने ही सुरक्षा वाढवण्यात आली.