न्यायालयातील खोटे, प्रलंबित ८० सहस्र २२२ दावे निकाली !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरची ही आहे समाजाची नैतिकता ! – संपादक 

पुणे – न्यायालयात दावा प्रविष्ट केल्यावर तक्रारदाराचा मृत्यू झाला, दावा प्रविष्ट केल्यानंतर सुनावणीसाठी तक्रारदार उपस्थित राहिला नाही किंवा समोरच्या व्यक्तीला त्रास देण्याच्या हेतूने प्रविष्ट केलेले खोटे आणि प्रलंबित ८० सहस्र २२२ दावे निकाली काढले. राज्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले सर्व दावे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २५६ आणि कलम २५८ अन्वये लोकअदालतीच्या माध्यमातून निकाली काढण्याची माहिती राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली.