ग्रामीण पोलीस दलातील महिलांना आता १२ ऐवजी ८ घंट्यांची नोकरी !

पुणे – महिला पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस दलातील सेवेसमवेतच कौटुंबिक दायित्व चांगल्या पद्धतीने पार पाडता यावे यांसाठी ग्रामीण पोलीस दलातील महिलांना १२ घंट्यांऐवजी ८ घंट्यांची नोकरी, असा पालट केला असल्याची माहिती ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली. पोलीस दलात कर्तव्यावर असतांना महिला पोलीस कर्मचार्‍यांना सण, उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे यांसाठी अनेक वेळा जादा घंट्यांची नोकरी करावी लागते. त्याचा कौटुंबिक दायित्व आणि कर्तव्य यांवर परिणाम होतो. पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस दलातील महिलांना येणार्‍या अडचणींचा विचार करून ८ घंटे कर्तव्य बजावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार डॉ. देशमुख यांनी याविषयीच्या सूचना प्रशासनाला दिल्या. १ सप्टेंबरपासून याची कार्यवाही चालू झाली.