‘जामिनावर सुटलेले आरोपी परत गुन्हे करणार नाहीत’, याची निश्चिती कोण देणार ? – संपादक
चिंचवड (पुणे) – लाच प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष अधिवक्ता नितीन लांडगे यांच्यासह ५ जणांना अटींची पूर्तता करण्याच्या नियमावर जामीन संमत झाला आहे. विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस्.बी. हेडाऊ यांनी जामीन संमत केला.