पुणे, १ सप्टेंबर – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आयुक्तपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून ११ मासांमध्ये जवळपास ५० टोळ्यांवर मकोका लावला आहे. बल्लूसिंह टाकच्या टोळीला अटक करून त्यांनी मोक्कांतर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) ५० वी कारवाई केली आहे. बल्लूसिंह टाकची टोळी कोथरूड येथे घरफोडी करून पळून जात असतांना ५ जुलै या दिवशी पोलिसांनी अ टक केली होती. या टोळीने वर्ष २०१८ पासून जबरी चोरी, हत्येचा प्रयत्न, घातक शस्त्र बाळगून दहशत माजवणे यांसारखे गंभीर गुन्हे केल्याचे उघड झाल्याने त्यांच्यावर मकोकाची कारवाई करण्यात आली. अशा टोळ्यांसमवेतच सोनसाखळी चोर्या, घरफोड्या, तसेच दरोडा टाकणार्या ३५० गुंडांवर मोक्का लावला आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ५० वी मकोका कारवाई !
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ५० वी मकोका कारवाई !
नूतन लेख
- मिठगवाणे (ता. राजापूर) येथील श्रमिक पतसंस्था फोडून १ कोटी रुपयांच्या मुद्देमालाची चोरी
- रत्नागिरी येथील सीए शाखेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
- ‘मी कोकणी उद्योजक’ म्हणून चिपळूण येथील प्रशांत यादव यांचा होणार सन्मान !
- आपत्तीविरोधात लढण्यासाठी चिपळूण नगर परिषदेकडून २ दिवसांचे प्रशिक्षण
- शरद पवार धर्मनिरपेक्ष नव्हेत, संधीसाधू आहेत ! – प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
- घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला अटक !