‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन’ (डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व) या विषयावर १० सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून जगातील ४० हून अधिक हिंदुद्वेष्ट्या विद्यापिठांनी ही परिषद आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक स्तरावर हिंदुत्वाच्या विचारांकडे मोठ्या प्रमाणात लोक आकर्षिले जात आहेत. विदेशातील हे वैचारिक आक्रमण केवळ हिंदु धर्मावर नसून ते भारताच्या विरोधातही आहे. त्यामुळे हे षड्यंत्र सर्वांसमोर यावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु-विरोधी प्रचार का वैश्विक षड्यंत्र !’ या विषयावर १ सप्टेंबर या दिवशी विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
वार, दिनांक आणि वेळ : बुधवार, १ सप्टेंबर २०२१, रात्री ७ वाजता
प्रमुख वक्ते
१. प्रा. मधु पूर्णिमा किश्वर, शिक्षणतज्ञ, लेखिका, संस्थापक संपादक – मानुषी
२. पंडीत सतीश शर्मा, हिंदू तत्वज्ञ, भारतीय संस्कृतीचे अभ्यासक – इंग्लंड
३. डॉ. यदु सिंह, कार्यकर्ता आणि आलोचक सिडनी, ऑस्ट्रेलिया
४. श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था