Exclusive : भारताने एकाही अफगाणी मुसलमानाला शरणार्थी म्हणून स्वीकारू नये !

लंडन येथील मानवाधिकार कार्यकर्ते आरिफ अजाकिया यांचा भारताला सल्ला

अफगाणिस्तानातील मानवी संकटाच्या माध्यमातून ‘स्थलांतर जिहाद’चे षड्यंत्र असण्याची दाट शक्यता !

आरिफ अजाकिया

फोंडा (गोवा) (श्री. विक्रम डोंगरे) – भारताने एकाही अफगाणी मुसलमानाला शरण देऊ नये. भारत अफगाणिस्तानातील अल्पसंख्य हिंदू आणि शीख यांना शरण देत आहे, हेच कौतुकास्पद आहे. तुर्कस्तान, ईराण, मलेशिया, पाकिस्तान, बांगलादेश यांसारखी मुसलमानांच्या हितांसाठी लढणारी अनेक ‘ठेकेदार’ राष्ट्रे आहेत. त्यांनीच खरेतर अफगाणी लोकांना स्वीकारायला हवे, असे स्पष्ट मत पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांच्या हितांसाठी लढणारे लंडन येथील आरिफ अजाकिया यांनी व्यक्त केले. दैनिक ‘सनातन प्रभात’ला दूरभाषवरून दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

अजाकिया पुढे म्हणाले की, सौदी अरेबियामध्ये हज यात्रेकरूंसाठी १ लाख तंबूंची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक तंबूमध्ये ३० लोक राहू शकतात. वर्षाचे ११ मास हे तंबू रिकामेच असतात. त्यामुळे सौदी अरेबिया अफगाणिस्तानातील लक्षावधी अफगाण्यांना सहजपणे शरण देऊ शकते. इराक-सीरिया यांप्रमाणे अफगाणिस्तानातून चालू असलेल्या स्थलांतराच्या माध्यमातून ‘स्थलांतर जिहाद’चे षड्यंत्र राबवले जाण्याची दाट शक्यता आहे, असे निश्चितच म्हणता येईल.

कराचीजवळ असलेल्या जमशेद शहराचे महापौर राहिलेले अजाकिया यांनी सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती, तसेच धर्मांधांमुळे जगासमोर निर्माण झालेली आव्हाने यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी दिलेली माहिती पुढे दिली आहे.

१. तालिबानमुळे जगासमोर महाभयानक संकट ओढावले आहे. अमेरिकेतील ९/११ चे आतंकवादी आक्रमण, माद्रिद (स्पेन) येथील जिहादी आक्रमण, लंडनमधील बाँबस्फोट आणि मुंबईतील २६/११ चे आक्रमण यांमागे अल्-कायदाच होते. वर्ष १९९६ ते २००१ या काळात अल्-कायदाचे वर्चस्व होते; परंतु आता ते न्यून झाले आहे, असे म्हटले जात आहे. हे सत्य नसून आताही २० वर्षांपूर्वीसारखीच परिस्थिती आहे.

२. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये ज्याप्रकारे त्याची सत्ता प्रस्थापित केली आहे, त्यामागे पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएस्आय’चा हात आहे. आयएस्आयनेच अफगाणिस्तानातील राजकीय नेत्यांना पैसे देऊन त्यांना हवे तसे वागवले. भारताने सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे; कारण अफगाणिस्तानकडे असलेली अर्ध्याहून अधिक शस्त्रास्त्रे पाकिस्तानमधील जिहादी आतंकवाद्यांपर्यंत पोचली आहेत.

३. पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांची स्थिती अत्यंत वाईट असून त्यांचा जवळ-जवळ संपूर्णच वंशविच्छेद करण्यात आला आहे.

५. ‘भारताने पाकिस्तानला आतंकवादी देश घोषित करण्यासाठी काय करावे ?’ या प्रश्नाला उत्तर देतांना अजाकिया म्हणाले, भारत दायित्वाने वागणारे लोकशाही राष्ट्र आहे. भारत ‘पाकला आतंकवादी देश घोषित करा’, असे थेट कधीच म्हणणार नाही. भारताकडून पाकवर आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्बंध घातले जाण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

६. सौदी अरेबियामध्ये एकही मदरसा नसून केवळ मशिदी आहेत. मुसलमान मुलांना वाढवण्यात घोडचूक होत असून मदरशांना बंद केले पाहिजे. मदरशांऐवजी मुलांना शिक्षण देण्यासाठी शाळा-महाविद्यालयांतच जाण्यास सांगितले पाहिजे. भारतातील ८५ टक्के बहुसंख्यांकांच्या विरोधात मदरशांमधून गरळओक करून ‘काफिरांना नष्ट करा !’, अशी चिथावणी दिली जात आहे.