बेंगळुरू महानगरपालिकेचा स्तुत्य निर्णय !
बेंगळुरू (कर्नाटक) – श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी येथील पशूवधगृहे, तसेच मांसविक्रीची सर्व दुकाने बंद रहातील, असा निर्णय बेंगळूरू महानगरपालिकेने घेतला आहे. महानगरपालिकेच्या पशू संवर्धन विभागाच्या सहाय्यक संचालकांनी ही अधिसूचना काढली आहे. यापूर्वीही श्रीकृष्ण जयंती आणि श्रीगणेश चतुर्थी या सणांच्या दिवशी महानगरपालिकेने मांसविक्रीवर प्रतिबंध घातला होता.