पोलिसांत तक्रार नोंद
हिंदु नाव दिले, तर हिंदू डोसे घेण्यासाठी येतील, असाच त्यामागे हेतू असणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे याला कुणी आता ‘आर्थिक जिहाद’ म्हटल्यास अयोग्य ठरू नये ! – संपादक
मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील इरफान नावाचा तरुण ‘श्रीनाथ’ डोसा विक्री केंद्र चालवत होता. या प्रकरणी हिंदूंकडून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी काही जणांनी विक्री केंद्राजवळ जाऊन केंद्राला ‘श्रीनाथ’ नाव का दिले ?’ अशी विचारणाही केली. तसेच त्यांनी येथील विक्री केंद्राचे नाव असलेले कापडी फलक फाडले, तसेच केंद्राची तोडफोड करत केंद्र हटवण्यास सांगितले. याविषयीचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे.
विक्री केंद्रातील कामगारांनी सांगितले की, हे विक्री केंद्र राहुल नावाच्या एका व्यक्तीच्या मालकीचे आहे. हे केंद्र चालवण्यासाठी त्याला प्रतिदिन ४०० रुपये देण्यात येतात. विक्री केंद्र चालवणार्या इरफानने सांगितले की, आम्ही गेल्या ५ वर्षांपासून हे विक्री केंद्र चालवत आहोत. नावामुळे आतापर्यंत कुणालाही अडचण आलेली नाही. ‘नाव’ ही समस्या असू शकते, असा आम्ही कधी विचारही केला नव्हता. (धर्मांधांचा साळसूदपणा ! – संपादक)