हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा रक्षाबंधन, २२.८.२०२१ या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त सौ. गौरी नीलेश कुलकर्णी यांनी केलेली कविता…
अभ्यासू वृत्तीचे मूर्तीमंत रूप ‘हिंदु जनजागृती समिती’ला लाभले ।
आरंभीपासूनच त्यांना वाचनाचा व्यासंग असे ।। १ ।।
वेळ मिळताच वाचत असती ते ग्रंथ ।
रेल्वे असो कि कार्यालय, ठिकाणाची नसे भ्रांत ।। २ ।।
जरी स्थापत्य अभियंता ते असती ।
परि साकारती इमारत ‘हिंदु राष्ट्र’रूपी ।। ३ ।।
या इमारतीचा पाया रचला त्यांनी चिंतनाचा ।
त्याद्वारे प्रसार केला गुरुदेवांच्या ज्ञानशक्तीचा ।। ४ ।।
‘लव्ह जिहाद’, ‘हलाल’सम आघात, त्यांनी उजेडात आणले ।
ते रोखण्यासाठी हिंदुशक्तीचे विशाल संघटन केले ।। ५ ।।
ग्रंथलेखन, दैनिक, धर्मप्रसार, संघटन, वक्ता-प्रवक्ता… ।
कुठल्या क्षेत्राचा त्यांना अनुभव नाही हो सांगा ।
यास्तवच ते असती हिंदुत्वाची ज्ञानगंगा ।। ६ ।।
गुरुदेवांच्या ज्ञानशक्तीचे वाहक बनलेले ।
गुरुदेवांचा दीर्घ सहवास लाभलेले ।
कार्यातील समस्यांचे उत्तर असलेले ।
समितीच्या कार्याशी तादात्म्य पावलेले ।। ७ ।।
असती आमचे रमेशदादा (टीप १) बहुआयामी ।
आहेत ते हिंदु राष्ट्राचे वैचारिक योद्धे ।
‘धर्मसंवादा’सह आत्मसंवाद साधूनी जावे ।
भवसागराच्या पैलतीराकडे ।। ८ ।।
टीप १ – श्री. रमेश शिंदे
– सौ. गौरी नीलेश कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.८.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |