१. वातावरणात चैतन्य पसरणे
‘एके दिवशी माझ्या मनात पुष्कळ विचार येत होते. त्यानंतर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आगाशीत (गच्चीत) तुळशीला पाणी घालायला येत आहेत, हे पाहिल्यावर ‘वातावरणात चैतन्य पसरले आहे’, असे मला वाटले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले उत्तर दिशेला तोंड करून प्रार्थना करतांना जाणवलेली सूत्रे
अ. माझ्या मनातील विचार अल्प झाले आणि माझा नामजप होऊ लागला.
आ. मला होणारा अनिष्ट शक्तींचा त्रासही अल्प झाला. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर समष्टीसाठीच प्रार्थना करत आहेत’, असे मला जाणवले.
३. समष्टीवर झालेले परिणाम
अ. समष्टीला त्रास देणार्या अनिष्ट शक्तींचा त्रास अल्प झाल्यामुळे ‘समष्टीच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेवर सकारात्मक परिणाम झाला आहे’, असे मला जाणवले.
आ. समष्टीचे आर्थिक आणि कौटुंबिक अडथळेही दूर झाले असल्याचे जाणवले.
इ. परात्पर गुरु डॉ. आठवले तुळशीला पाणी घालत असतांना ‘त्याचा परिणाम समष्टी स्तरावर होत आहे’, असे मला जाणवले.
४. स्वतःत जाणवलेले पालट
अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना तुळशीला पाणी घालतांना पाहून माझ्या अनाहत आणि सहस्रार या चक्रांवर शीतल संवेदना जाणवल्या.
आ. ‘ते तुळशीला घालत असलेल्या पाण्याचा प्रवाह माझे डोके आणि अनाहत चक्र यांवर पडत आहे आणि माझ्या सर्व चक्रांची शुद्धी होत आहे’, असे मला जाणवले.’
– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.३.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |