‘गुरुसेवा’ हाच चेतनचा निरंतर ध्यास ।

श्रावण शुक्ल पक्ष तृतीया (११.८.२०२१) या दिवशी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्त साधिकेने त्यांना दिलेल्या कवितारूपी शुभेच्छा पुढे दिल्या आहेत.

श्री. चेतन राजहंस
अश्‍विनी कुलकर्णी

धरूनी दृढ श्रद्धेची कास ।
‘गुरुसेवा’ हाच निरंतर ध्यास ।। १ ।।

चित्तात वसे वात्सल्यभाव ।
घडवण्या एकेका गुरुसेवकास ।। २ ।।

रामनाथी वैकुंठातील ज्ञानकुंभ ।
प्रवाहित होतसे तव वाणीतून ।
ज्ञानामृत पुरवी समष्टीस, गुरुगृहीचे ।। ३ ।।

पंचवेद, उपनिषदे, पुराणे आणि धर्मग्रंथ ।
यांचे अध्ययन करून वेचले ज्ञानमोती निरंतर ।
देऊ केले समष्टीस ज्ञान ते अपरंपार ।
ग्रंथ आणि संहिता सेवा करोनिया ।। ४ ।।

प्रत्येक क्षण केला गुरुचरणी समर्पित ।
व्यष्टी-समष्टी साधनेत गुरुचरण पहातसे ।
‘हिंदु राष्ट्र’नामक रामराज्य आणावया ।
अष्टौप्रहर अंतरीची तळमळ असे ।। ५ ।।

जसा सेवेचा वेग अफाट, तसाच साधो वेग प्रगतीचा ।
हीच प्रार्थना गुरुचरणी आता ।
चैतन्यमय चेतन जावो संतपदा ।। ६ ।।

– अश्विनी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.८.२०२१)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक