‘अखिल भारत ग्राहक परिषदे’च्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी आयोजित चर्चासत्रामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘अखिल भारत ग्राहक पंचायती’च्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा!’ या संदर्भात एका विशेष वेबिनारचे (ऑनलाईन चर्चासत्राचे) आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा आणि अखिल भारत ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष ए.व्ही. बागुरजी यांनी संबोधित केले. या वेळी श्री. गौडा यांनी ‘स्वातंत्र्य आणि सुराज्य (हिंदु राष्ट्र)’ यांविषयी माहिती सांगितली. श्री. बागुरजी यांनी ‘राष्ट्रध्वजाचा मान कसा राखू शकतो?’, याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा लाभ अनेक ग्राहक आणि राष्ट्रप्रेमी कार्यकर्ते यांनी घेतला.