गोव्यातील संचारबंदीत ३० ऑगस्टपर्यंत वाढ

सौजन्य : R. News

पणजी, २२ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यातील संचारबंदीमध्ये ३० ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राज्यशासनाने या अनुषंगाने २२ ऑगस्ट या दिवशी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. राज्यातील संचारबंदी २३ ऑगस्ट या दिवशी सकाळी ७ वाजता संपुष्टात येणार होती.

संचारबंदी वाढवल्याने कॅसिनो बंदच रहाणार

राज्यशासनाने संचारबंदीत वाढ करतांना पूर्वीच्या आदेशाप्रमाणे राज्यातील कॅसिनो, स्पा, ‘मसाज पार्लर’ आदींवरील निर्बंध कायम ठेवले आहेत. यामुळे राज्यातील कॅसिनोही बंदच रहाणार आहेत. गोवा प्रदेश काँग्रेस समितीने २१ ऑगस्ट या दिवशी राज्यपालांची भेट घेऊन राज्यात कोरोनाचा संसर्ग अल्प होईपर्यंत कॅसिनो चालू करण्यास अनुमती न देण्याची मागणी केली होती. गतवर्षी कॅसिनोला प्रारंभ केल्यानंतर राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला होता, असा काँग्रेसचा दावा आहे.