‘हरिद्वार कुंभमेळ्याच्या वेळी देहली सेवाकेंद्रात राहूनच सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी सेवाकेंद्रात राहून मी ‘येथेच हरिद्वार आहे’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करण्यास आरंभ केला. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी भावजागृतीचे पुढील प्रयत्न सुचवले.
१. ‘प्रत्येक नळातून गंगाच वहात आहे आणि त्यातून येणार्या पाण्याने गंगामातेचाच स्पर्श होत आहे.’
२. हरिद्वार येथील हराची पौडी घाटावर भगवान शिवाची मोठी मूर्ती आहे. त्याचप्रमाणे देहली सेवाकेंद्रात परात्पर गुरुदेवांचे मोठे छायाचित्र आहे. तेच भगवान शिव आहेत आणि तेच गंगामाताही आहेत.
३. सेवाकेंद्र म्हणजे आमचा सनातनचा कुंभमेळ्यातील मंडपच आहे.
परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच हे भावजागृतीचे प्रयत्न झाले. त्यासाठी त्यांच्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु . मनीषा माहूर, देहली सेवाकेंद्र (१६.३.२०२१)