राज्यातील सराफांचा २३ ऑगस्ट या दिवशी एक दिवसाचा लाक्षणिक संप !

पिंपरी (पुणे), २२ ऑगस्ट – ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड’ने (बी.आय.एस्.) हॉलमार्किंग शुद्धतेच्या ४ प्रमाणित शिक्क्यांमध्ये पालट केले आहेत. ‘हॉलमार्किंग युनिक आयडी’द्वारे शुद्धता तपासणीची चुकीची आणि असंवैधानिक पद्धत आणली आहे. हे करीत असतांना सुवर्णकारांच्या शिखर संस्थांसमवेत चर्चा न करता हे पालट करण्यात आले आहेत. या पद्धतीमुळे ग्राहक आणि व्यापारी यांनाही त्रास होणार आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन’च्या वतीने २३ ऑगस्ट या दिवशी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी जाहीर केले आहे.