पाकमध्ये धर्मांधांनी ठिकठिकाणी फडकावले तालिबानी झेंडे !

पाकचे सरकार, सैन्य आणि नागरिक या तिघांचेही तालिबानला असणारे समर्थन भारताला धोकादायक !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यापासून पाकमध्ये आनंद साजरा केला जात आहे. राजधानी इस्लामाबादसह अनेक शहरांत तालिबानचा झेंडा फडकावण्यात आला. इस्लामाबादच्या जामिया हफ्सा मदरशावरही तालिबानचा झेंडा फडकावण्यात आला आहे. तसेच काही मौलानांनी तालिबानला शुभेच्छाही दिल्या आहे.