नवी देहली – विनाअनुदानित घरगुती एल्पीजी सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर देहली आणि मुंबई शहरांमध्ये घरगुती वापरासाठी १४.२ किलो एल्पीजी सिलिंडरची किंमत ८५९.५ रुपयांवर गेली आहे. ही वाढ १६ ऑगस्टच्या रात्रीपासूनच लागू झाली आहे. त्याचप्रमाणे १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतही ६८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. देहलीमध्ये त्याची किंमत आता १ सहस्र ६१८ रुपये झाली आहे. तेल आस्थापने प्रत्येक मासाच्या १ आणि १५ दिनांकाला एल्पीजीच्या किमतीचा आढावा घेतात.