संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्राध्यापक डॉ. नरेंद्र कुंटे यांचे निधन !

डॉ. नरेंद्र कुंटे

सोलापूर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्राध्यापक डॉ. नरेंद्र कुंटे यांचे ८ ऑगस्ट या दिवशी निधन झाले. त्यांनी येथील दयानंद महाविद्यालयात मराठीचे विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले होते. संत साहित्य आणि संत चरित्र यांवर त्यांनी विविध वृत्तपत्रांतून विपुल लेखन केले आहे, तसेच आध्यात्मिक विषयांवरील त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. संत साहित्य सेवा संघाच्या वतीने त्यांचा ‘पुरुषोत्तम सेवा’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता, तसेच अन्य पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला होता.