परमबीर सिंह यांनी खंडणी घेतल्याच्या प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी !

ठाणे – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह पाच जणांच्या विरोधात पाच कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा गुन्हा कोपरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आहे. या प्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींना न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनील जैन आणि संजय पुनामिया अशी या आरोपींची नावे आहेत.

परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असतांना २०१८ मध्ये यूएल्सी घोटाळ्याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरोधातील मोक्का कायद्यांतर्गत होणारी कारवाई टाळण्यासाठी परमबीर सिंह, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन उपायुक्त पराग मणेरे, सुनील जैन, संजय पुनामिया, मनोज घोटेकर यांनी ४ कोटी ६८ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिकाच्या पुतण्याने केला होता.