‘लक्ष्य रखा कि लक्ष रहता है ।
(लक्ष्य अर्थात् ध्येय । लक्ष अर्थात् ध्यान ।)
भावार्थ : ध्येय ठेवून प्रयत्न केल्यावर आपल्यावर श्री गुरूंचे, म्हणजे साक्षात् भगवंताचे लक्ष रहाते. ध्येय ठेवल्यामुळे कारणदेह (बुद्धी) शुद्ध होतो आणि तो मनाला ध्येयानुरूप दिशा देण्यास सक्षम रहातो.
लक्ष्य ये लक्ष्मण जैसा है ।
ध्येय श्रीराम की प्राप्ति ।
सतत राम के साथ रहकर रामस्मरण ।
श्रीरामजी के अनुसंधान से ।
श्रीराम की अखंड सेवा द्वारा ।
श्रीराम की प्राप्ति करना ।।
भावार्थ : साधक जेव्हा लक्ष्मणाप्रमाणे ध्येय ठेवून साधना करतो, तेव्हा त्याला त्याच्या ध्येयाची, म्हणजे श्रीरामाची प्राप्ती होते. लक्ष्मणाला जसा श्रीरामाचा संग आणि सत्संग मिळाला अन् श्रीरामाची आंतरिक प्राप्ती झाली, तसेच साधक जेव्हा ध्येय ठेवून मागदर्शन घेऊन साधना करतात, तेव्हा त्यांच्यासाठी ध्येयप्राप्ती सहज सुलभ असते. गुरुकृपायोगात अखंड गुरुस्मरणातून आणि सतत गुरुसेवेतून साधकाला पूर्ण गुरुकृपेची, म्हणजे आनंदाची प्राप्ती होते.’
– कु. पूनम चौधरी, देहली सेवाकेंद्र (३१.७.२०२१)