१. १३.९.२०२० या दिवशी रात्री स्वप्नात दिसलेले दृश्य
१ अ. स्वप्नात सांगली येथे सगळीकडे बर्फ दिसून नंतर सगळीकडे जळलेली घरे दिसणे आणि तेथे आईचा शोध घेणे : स्वप्नात मला पुढीलप्रमाणे दृष्य दिसले ‘सांगलीच्या आम्ही रहात असलेल्या भागात अनेक घरांवर बर्फाचे डोंगर आहेत. सर्व मार्गांवर बर्फाचे डोंगर आहेत. त्या बर्फातून छोट्याशा जागेतून मी सायकलवरून जात होतो. मला माझ्या आईची (आईचे देहावसान झाले आहे.) काळजी वाटू लागली. मी तिच्या घराकडे जाऊ लागलो. त्या भागात सगळीकडे घरे पूर्ण जळलेल्या अवस्थेत होती. ‘घराकडे कसे जायचे ?’, ते मला कळेना. मी कोपर्यावर उभ्या असलेल्या काही लोकांना विचारले, ‘ही गल्ली कुठे आहे ? तो वाडा कुठे आहे ?’ सर्व वाड्यातील चाळीवजा घरे जळली असून मला घरांचे सांगाडे दिसत होते. त्या लोकांनी मला त्या वाड्यातील लोक जवळच गेल्याचे सांगितले.
१ आ. झाडाखाली एक महिला दिसणे; परंतु ती आई नसून दुसरीच महिला असणे : मी शोध घ्यायचा प्रयत्न केल्यावर मला एका झाडाखाली लाल रंगाची साडी नेसलेली वयस्कर महिला दिसली. मी जवळ जाऊन पाहिल्यावर माझ्या लक्षात आले, ‘ती वेगळीच महिला आहे.’ मी पुन्हा इकडे-तिकडे पाहू लागलो.’ तेवढ्यात मला जाग आली. त्या वेळी रात्रीचे २.३० वाजले होते.
२. आठ दिवसांनी दुपारी स्वप्नात दिसलेले दृश्य
२ अ. स्वप्नात पहिल्या माळावर असलेल्या घरातील आगाशीपर्यंत पाणी आल्याचे दिसणे : त्यानंतर ८ दिवसांनी दुपारी मला स्वप्नात दिसले, ‘सांगलीत आमच्या घरासमोर पाण्याचा मोठा डोह आहे. पहिल्या माळ्यावरील आगाशीपर्यंत पाणी आहे. बाहेर सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे. साहाय्यासाठी कुणीच दिसत नाही. पाणी हळूहळू सज्जातून आत यायला लागले आहे.’ तेवढ्यात मला जाग आली.’
– श्री. दत्तात्रय कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), गावभाग, सांगली. (३०.९.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |