लोकसंख्या नियंत्रण कायद्याअभावी भारताची अवस्था कर्करोगाप्रमाणे झाली आहे ! – साध्वी डॉ. प्राची

वाढत्या लोकसंख्येमुळे साधन-सुविधा अल्प पडत आहेत, हे आपण कोरोनाच्या काळात अनुभवले. त्यामुळे ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ पुष्कळ पूर्वीच व्हायला हवा होता. आज घुसखोर रोहिंग्यांना हाकलले, तर ‘सेक्युलर’ (निधर्मी) आणि डाव्या विचारसरणीचे लोक स्वत:ची छाती बडवण्यास प्रारंभ करतात; मात्र ज्या वेळी लाखो काश्मिरी हिंदूंना स्वत:च्या देशात विस्थापित होऊन तंबूत रहावे लागले, तेव्हा हे ‘सेक्युलर’ आणि डाव्या विचारसरणीचे लोक कुठे गेले होते ? गेल्या ७४ वर्षांत घुसखोरांना वसवल्यामुळे देशाला ‘कर्करोग’ झाल्यासारखी स्थिती आहे. लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या माध्यमातून या रोगावर शस्त्रक्रिया करायला हवी. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसंख्या नियंत्रण कायदा लवकरात लवकर करावा.