शेगाव – येथील ‘श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थान’चे विश्वस्त श्री. शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती गेल्या ३ दिवसांपासून अस्वस्थ झाली आहे; मात्र त्यांनी ‘मला कुठल्याही रुग्णालयात हालवू नका’, असे सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्यावर रहात्या घरी आधुनिक वैद्य हरीश सराफ यांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार चालू आहेत.
श्री. शिवशंकरभाऊ यांचा रक्तदाब अल्प झालेला असून त्यांना कृत्रिम ‘ऑक्सिजन’चा पुरवठा केला जात आहे. त्यांनी आयुष्यभर आयुर्वेदीय उपचारांनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भात बुलढाणा येथील आयुर्वेदतज्ञ वैद्य गजानन पडघान यांनाही तिथे बोलावण्यात आले आहे.