हिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःपासून करा ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

श्री. आनंद जाखोटिया

‘आपली भाषा, धर्मग्रंथ, संत, मंदिर, संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांना राजाश्रय मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच हिंदु राष्ट्र स्थापन होईल. प्रथम हिंदूंनी धर्माचरण करून स्वतःपासून हिंदु राष्ट्राचा प्रारंभ करावा लागेल. त्याचसमवेत राष्ट्रीय जीवनात धर्म प्रतिष्ठापित व्हावा, यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी करावी लागेल. इस्रायलने त्याची भाषा, सण, परंपरा यांना राजाश्रय देऊन स्वतःला ‘ज्यू राष्ट्र’ घोषित केले. भारताने त्याच्याकडून बोध घ्यायला हवा.