एकदा जागृत झालेला हिंदु धर्मांतरित होत नाही, त्यामुळे हिंदूंना धर्मशिक्षण द्या ! – चेतन गाडी, तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

चेतन गाडी

कोरोना महामारीच्या काळात १ लाखांहून अधिक हिंदूंचे धर्मांतर केल्याचे ख्रिश्चन मिशनरी उघडपणे सांगत आहेत. धर्मांतरावर मूलभूत उपाय म्हणजे हिंदूंना आपल्या धर्माचे शिक्षण देणे, हा आहे. हिंदु जनजागृती समितीने चालू केलेल्या ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गाच्या माध्यमातून हिंदूंना जागृत आणि संघटित केले जात आहे. एकदा जागृत झालेला हिंदु धर्मांतरित होत नाही.