आफ्रिकी स्थलांतरितांची नौका समुद्रात बुडून ५७ जणांचा मृत्यू !

त्रिपोली (लिबिया) – आफ्रिकी स्थलांतरितांना युरोपकडे घेऊन जाणारी नौका लिबियाच्या समुद्रात बुडाल्याने ५७ लोक मृत्यूमुखी पडले. नौकेच्या इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. युरोपात चांगली जीवनशैली असल्यामुळे आफ्रिका, तसेच सीरिया येथील लक्षावधी लोक गेल्या काही वर्षांपासून युरोपात स्थलांतरित होत आहेत. या क्षेत्रातील समुद्रक्षेत्रात अशा प्रकारच्या दुर्घटना वरचेवर होत असतात. आता झालेल्या दुर्घटनेत २० जणांना वाचवण्यात यश आले असून ते नायजेरिया, घाना आणि गँबिया देेशांतील आहेत.