पिंगुळी येथे गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज
प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज

पिंगुळी – येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिर आणि प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज समाधी मंदिर येथे २३ जुलैला गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात अन् भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.  कोरोनाविषयीचे शासनाचे सर्व नियम पाळून हा उत्सव साजरा करण्यात आला.

प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांची गुरुपौर्णिमेनिमित्त सजवलेली समाधी

पहाटे काकड आरतीने उत्सवास प्रारंभ झाला. त्यानंतर प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात सर्व भक्तांच्या वतीने श्री. प्रकाश गुरव आणि सौ. आशा प्रकाश गुरव यांनी अभिषेक केला, तर प.पू. सद्गुरु समर्थ (अण्णा) राऊळ महाराज यांच्या समाधीस्थानी सर्व भक्तांच्या वतीने श्री. विठोबा विनायक राऊळ यांनी अभिषेक पूजा केली. त्यानंतर आरती, महाप्रसाद, धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा, असे कार्यक्रम झाले.