‘२५.४.२०२० या दिवशी आरशात पहातांना मला ‘माझ्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रतिबिंब दिसायला हवे’, असे वाटत होते; परंतु तसे होण्यासाठी मला गोपींसारखी भक्ती करायला हवी; कारण ‘गोपींना सर्वत्र कृष्णच दिसायचा’, असा विचार करतांना मला पुढील ओळी सुचल्या.
आरशात मी स्वतःला पहातांना ।
प्रतिबिंबातूनी पहाती मज श्रीगुरु ।। १।।
बिंबाच्या अंतरी श्रीगुरु जेव्हा बसती ।
तेव्हाच असे अनमोल क्षण अनुभवता येती ।। २।।
क्षण क्षण जेव्हा ऐसा भावमय होई ।
तेव्हाच श्रीगुरु नित्य सोबती येई ।। ३।।
अंतरात माऊली नित्य सोबती येई ।
अंतरात नित्य निवास करण्या श्रीगुरूंना करूया आता घाई ।। ४।।
मग अंतरीच्या दशदिशांना ।
श्रीगुरूंच्या अस्तित्वाने आनंदाची लयलूट होई ।। ५।।
– कु. स्वाती गायकवाड (आताच्या सौ. स्वाती शिंदे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.४.२०२०)