परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आवाजातील ‘शंकानिरसन’ आणि ‘साधना’ या विषयांवरील ध्वनीफिती ऐकल्यानंतर शिकायला मिळालेली सूत्रे !

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टरांनी काही वर्षांपूर्वी ‘साधक आणि जिज्ञासू यांच्या अध्यात्मातील शंकांचे निरसन व्हावे’, यासाठी ‘शंकानिरसन’ आणि ‘साधना’ या विषयांवरील ध्वनीफिती प्रकाशित केल्या होत्या. या ध्वनीफितींत ‘नामजप कसा करावा ? नामजप करतांना येणार्‍या अडचणींवर उपाय, व्यष्टी आणि समष्टी साधना, अध्यात्माचे तात्त्विक आणि प्रायोगिक भाग’ यांविषयी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन केले आहे. अनेक साधकांना या मार्गदर्शनाचा लाभ झाला आणि आजही होत आहे. या ध्वनीफिती ऐकल्यावर मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. गिरीश पंडित पाटील

१. नव्याने साधनेला आरंभ करणार्‍या साधकांनी या ध्वनीफिती ऐकल्यास त्यांना अल्प वेळेत अध्यात्माविषयी पुष्कळ शिकायला मिळेल आणि त्यांचा साधनेचा पाया भक्कम होण्यास साहाय्य होईल.

२. साधकांनी या ध्वनीफिती १ – २ आठवड्यांच्या अंतराने ऐकल्या, तर त्यांना ‘त्या आठवड्यामध्ये होणार्‍या विविध प्रसंगांवर काय दृष्टीकोन ठेवावा’, याचे मार्गदर्शन मिळेल.

३. समाजातील व्यक्तींना संपर्क करणार्‍या साधकांनी या ध्वनीफिती ऐकून त्यातील सूत्रे लिहून ठेवल्यास त्यांना जिज्ञासूंनी विचारलेल्या शंकांचे योग्य प्रकारे निरसन करता येईल.

४. या ध्वनीफितींतील परात्पर गुरुदेवांचे मार्गदर्शन ऐकतांना माझी भावजागृती झाली.

५. परात्पर गुरुदेवांनी २० ते २५ वर्षांपूर्वी हे मार्गदर्शन केले आहे. त्यामध्ये सांगितलेले सर्वकाही आजच्या परिस्थितीतही लागू होते. यातून गुरुदेवांचा द्रष्टेपणा लक्षात येतो.

६. यातून परात्पर गुरुदेवांना साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी असलेली तळमळ आणि त्यांची साधकावरील प्रीती लक्षात येते.

विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला या ध्वनीफिती ऐकायला मिळाल्या. गुरुदेवांनी मला शिकण्याच्या स्थितीत ठेवले. त्याविषयी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

‘परात्पर गुरुदेवांनी केलेल्या या अमूल्य मार्गदर्शनाचा सर्व साधकांना लाभ होवो आणि त्यांच्या शंकांचे निरसन होऊन सर्वांची लवकर प्रगती होवो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !’

– श्री. गिरीश पंडित पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक