सर्वांशी सहजतेने जवळीक साधणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांवरील दृढ श्रद्धेमुळे घर-संसाराच्या मोहजालातून सहजतेने बाहेर पडून झोकून देऊन साधना करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजाराम पाध्ये !

श्री. राजाराम पाध्ये !

१. प्रत्येक क्षणाचा साधनेसाठी उपयोग करणे आणि सर्वांमध्ये मिसळून वागणे

‘२२.३.२०२१ या दिवशी श्री. राजाराम पाध्ये यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे कळल्यावर आम्हाला पुष्कळ आनंद झाला. त्यांनी प्रसार सेवा करतांना पुष्कळ कष्ट घेतले आहेत. ‘प्रत्येक क्षण साधनेसाठीच कसा वापरता येईल’, हे त्यांनी पाहिले. आमच्याकडे सत्संगाला आल्यावर ते सर्वांमध्ये सहज मिसळून जायचे. ‘त्यांचा सत्संग मिळणार’, असे समजल्यावर आम्हाला आनंद व्हायचा. त्यांच्या घरी गेल्यावर ‘आम्ही दुसर्‍या कुणाच्या घरी गेलो आहे’, असे आम्हाला वाटायचे नाही. ते आणि त्यांच्या घरची मंडळी आमच्यात सहज मिसळायचे.

श्री. सुनील निनावे

२. साधकांची साधना होण्याची तळमळ असणे

काकांनी आमची साधना होण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले. आम्हाला भेटल्यावर ते ‘साधनेचे प्रयत्न चालू आहेत ना ?’, असे प्रेमाने विचारून घरातील व्यक्तींचीही विचारपूस करायचे.

३. सर्वांना ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ मिळावे’, यासाठी प्रयत्न करणे

दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रकाशित होऊ लागल्यावर काका प्रतिदिन १५ किलोमीटर दूर अंतरावर दैनिक आणण्यासाठी जायचे. सर्वांना ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चा सत्संग मिळावा’, असा त्यांचा प्रयत्न असायचा. ‘गुरूंचे कार्य झोकून देऊन कसे करायचे ?’, ते त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.

४. प्रपंचाचा सर्व भार ईश्वरावर सोपवून पूर्णवेळ साधना करणे 

साधनेकडे लक्ष देता यावे; म्हणून काकांनी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी त्यांनी त्यांचे किराणा मालाचे दुकान, अन्य संपत्ती, तसेच ‘कुणी काय म्हणेल’, यांचा विचार केला नाही. ते सर्व मोहजालातून सहज बाहेर पडले. त्यांनी प्रपंचाचा सर्व भार ईश्वरावर सोपवला आणि देवावर श्रद्धा ठेवून साधनेकडे लक्ष दिले. त्यांचा गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे.

परात्पर गुरु डॉक्टरांनी पाध्येकाकांची आध्यात्मिक प्रगती करून घेऊन आम्हाला आनंदाची वार्ता दिली. त्याविषयी त्यांच्या चरणी कृतज्ञता ! ‘काकांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होऊन ‘त्यांना संतपद प्राप्त होवो’, अशी भगवान श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांच्या चरणी प्रार्थना !’

– श्री. सुनील निनावे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक