कासगंज (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ६ ख्रिस्त्यांना अटक

धर्मांतरास विरोध करणार्‍या हिंदु जागरण मंचच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न  

दिवसाढवळ्या आणि तेही हिंदूंच्या भागात येऊन हिंदूंचे धर्मांतर करण्याचे ख्रिस्त्यांचे धारिष्ट्य होते, तसेच विरोध केल्यावर हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न होतो, ही गंभीर घटना असून राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या धर्मांध ख्रिस्त्यांची पाळेपुळे खणून काढून सर्वांना कारागृहात डांबले पाहिजे, तसेच त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

कासगंज (उत्तरप्रदेश) – कासगंज जिल्ह्यातील गंगपूरमध्ये हिंदूंच्या भागात ख्रिस्ती धर्माचा प्रकार करणार्‍यांच्या विरोधात हिंदु जागरण मंचकडून तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. हे ६ जण येथे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आले आहे. श्रीनिवास, राहुल कुमार, शिवकुमार, दुर्गेश, रामपाल आणि किशन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (हिंदु नावे धारण करणारे बाटगे ख्रिस्ती ! हिंदूंचे धर्मांतर करणे सोपे जावे, यासाठी हे बाटगे ख्रिस्ती स्वतःचे नाव पालटत नाहीत. अशांपासून हिंदूंनी सावध रहावे ! – संपादक)

हिंदु जागरण मंचच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, या ख्रिस्त्यांना विरोध केला असता त्यांनी कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. (धर्मांध ख्रिस्त्यांना कायद्याचे भय राहिलेले नाही, हे यातून दिसून येते ! – संपादक) तेव्हा त्यांनी पोलिसांना याची माहिती दिल्यावर पोलिसांनी या ६ जणांची चौकशी केल्यावर त्यांच्याकडे आक्षेपार्ह साहित्य सापडले. यात हिंदूंच्या देवतांच्या विषयी अश्‍लील लिखाण होते.

बागपत येथे धर्मांधांनी १५ वर्षी हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचे धर्मांतर करत गोमांस खाऊ घातले !

अशा वासनांध धर्मांधांना कठोर शिक्षा करण्याची मागणी समाजवादी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, साम्यवादी आदी राजकीय पक्ष, तसेच पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी का करत नाहीत ?

बागपत जिल्ह्यामध्ये एका १५ वर्षीय हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार, धर्मांतर आणि गोमांस खाऊ घालण्याच्या प्रकरणी पोलिसांनी शहजाद आणि त्याचे आई-वडील यांना अटक केली. ही मुलगी ७ मासांची गर्भवती असल्याचे लक्षात आल्यावर ही घटना उघड झाली.