रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील आधुनिक वैद्य भिकाजी भोसले (वय ६९ वर्षे) यांच्या कुटुंबियांना त्यांच्यात जाणवलेले पालट

१५.७.२०२१ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे आधुनिक वैद्य भिकाजी भोसले यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त गेल्या ६ मासांपासून त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

आधुनिक वैद्य भिकाजी भोसले यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

१. आधुनिक वैद्य भिकाजी भोसले यांच्यामधील ‘अपेक्षा करणे, अधिकारवाणीने बोलणे, चिडचिड करणे आणि प्रतिक्रियात्मक बोलणे’, हे स्वभावदोष पुष्कळ प्रमाणात उणावले आहेत.

२. आता ते इतरांवर न रागावता किंवा प्रतिक्रियात्मक न बोलता इतरांना समजून घेत आहेत.

३. ते इतरांशी प्रेमाने बोलतात आणि त्यांना समजून घेऊन साहाय्य करतात.

सौ. कस्तुरी भोसले

४. त्यांना आश्रमातील बालसाधक कु. मुकुल प्रभु (वय १० वर्षे) याच्याविषयी प्रेम वाटत होते. आता त्यांना आश्रमातील सर्व बालसाधकांविषयी प्रेम आणि जिव्हाळा वाटतो.

५. ते आश्रमातील ध्यानमंदिरातील देवतांची सायंकाळची आरती अत्यंत भावपूर्णरित्या करतात. त्याचप्रमाणे ते संतांनी सांगितलेल्या ‘दत्तमाला मंत्रा’च्या पठणाचे नियोजन आणि मंत्रपठण करण्याची सेवाही भावपूर्णरित्या करतात.

त्यांच्यातील हे पालट आम्हा कुटुंबियांसह त्यांच्या संपर्कात येणार्‍या आश्रमातील अन्य साधकांनाही जाणवतात. ‘त्यांच्यातील हे पालट देवाच्याच कृपेने झाले आहेत’, यासाठी आम्ही देवाच्या चरणी कृतज्ञ आहोत.’

– आधुनिक वैद्या (सौ.) कस्तूरी भोसले (पत्नी) आणि कु. मधुरा भोसले (कन्या), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (११.७.२०२१)


देवा, तुझ्या कृपेने पालट झाले ।

कु. मधुरा भोसले

माझे बाबा आनंदी झाले ।।

श्री गुरूंची माझ्या बाबांवर कृपा झाली ।
त्यांची बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख झाली ।। १ ।।

त्यांच्या व्यष्टी साधनेची घडी बसली ।
आणि त्यांचा राग आणि चिडचिड न्यून झाली ।। २ ।।

त्यांचा अहंकार उणावला ।
आणि त्यांचा स्वभाव विनम्र झाला ।। ३ ।।

त्यांचा कर्तेपणा देवाच्या चरणी अर्पण झाला ।
आणि अंतरात कृतज्ञताभाव जागृत झाला ।। ४ ।।

श्री गुरुकृपेने आंतरिक पालट झाला ।
आणि त्यांचा स्वभाव प्रेमळ झाला ।। ५ ।।

देवा, तुझ्या कृपेने पालट झाले ।
आमचे बाबा आनंदी झाले ।। ६ ।।

देवा, तुझ्या कृपेनेच हा चमत्कार घडला ।
बाबांच्या स्वभावात सकारात्मक पालट झाला ।। ७ ।।

– कु. मधुरा भोसले (कन्या) (११.७.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक