वाढदिवस हिंदु धर्माप्रमाणे तिथीला साजरा केल्यास जिवाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होत असणे

श्री. नंदकिशोर नारकर

‘आपण हिंदु असूनही वाढदिवस इंग्रजी पंचांगानुसार दिनांकाला का साजरा करतो ? आपले सर्व सण हिंदूंच्या पंचांगातील मास (महिने) आणि तिथी यांनुसार साजरे करतो, उदा. गुढीपाडवा, श्री गणेशचतुर्थी, दसरा आणि दिवाळी इत्यादी हिंदु पंचांगानुसार तिथीलाच साजरे होतात. आपले सण इंग्रजी दिनांकाप्रमाणे ठराविक दिनांकालाच येत नाहीत. हिंदूंच्या संतांच्या पुण्यतिथी आणि देवतांच्या जयंतीसुद्धा हिंदु पंचांगानुसार साजर्‍या होतात, उदा. तुकाराम बीज, दासनवमी, रामनवमी इत्यादी, तसेच विवाह, वास्तुशांत यांसाठीही मुहूर्त पाहिले जातात. हे सर्व हिंदु धर्माप्रमाणे पंचांगानुसार केले जाते. असे असतांना ‘वाढदिवस इंग्रजी पंचांगानुसार दिनांकाला का साजरा करावा ?’, असा प्रश्न निर्माण होतो. जिवाने वाढदिवस जर तिथीला साजरा केला, तर त्याला तिथीचे चैतन्य ग्रहण होऊन आध्यात्मिकदृष्ट्या लाभही होतो.’

– श्री. नंदकिशोर दत्तात्रेय नारकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.१०.२०२०)