परभणी येथे गतीमंद तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी मौलवीवर गुन्हा नोंद !

  • स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !
  • अशा वासनांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
  • अशा घटनेत जर चुकून एखद्याच्या पुजार्‍याचे किंवा संतांचे नाव आले असते, तर एव्हना पुरो(अधो)गामी, तथाकथित निधर्मी, हिंदुद्वेषी माध्यमे यांनी आकाशपाताळ एक केले असते आणि हिंदु धर्माला करता येईल तितके अपकीर्त केले असते ! आता हे सर्व जण कोणत्या बिळात लपून बसले आहेत ?

परभणी – शहरातील पिंगळी रस्त्यावरील खानापूर फाटा येथे रहाणार्‍या एका २५ वर्षीय गतीमंद (बुद्ध्यांक ७० ते ९० मध्ये असणार्‍यांना ‘गतीमंद’, तर ७० पेक्षा अल्प असणार्‍यांना ‘मतीमंद’ म्हणतात.) तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी मौलाना कलीम शेख बद्रोद्दीन शेख या मौलवीवर विनयभंग आणि ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याच्या अंतर्गत नवा मोंढा पोलीस ठाण्यात २७ जून या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचे साहाय्यक पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार पुढील अन्वेषण करत आहेत.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २६ जून या दिवशी सायंकाळी ४ वाजता ती आणि तिची आजी घरी होते. त्या वेळी त्यांच्या गल्लीत रहाणारा मौलाना कलीम शेख बद्रोद्दीन शेख तिच्या घरी आला. त्याने भांडे घासत बसलेल्या तरुणीच्या हाताला धरून घरातील आतील खोलीत नेले. याठिकाणी मौलवीने तरुणीचा विनयभंग केला. ‘घडलेली घटना कुणाला सांगितली, तर घरच्या लोकांना मारून टाकीन’, अशी धमकी त्याने दिली. (धर्मांधांच्या अशा धमकीमुळे आतापर्यंत अत्याचारपीडित महिला आणि तरुणी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे या प्रकरणात धमकी दिल्याचाही गुन्हा नोंद करून मौलवी शेख याच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी ! – संपादक) सायंकाळी तरुणीचे आई-वडील घरी आल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर आई वडील यांनी मौलाना कलीम शेख याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

मौलवीवर कारवाई करण्याची ‘विवेक विचारमंच महाराष्ट्र’ची मागणी

गतीमंद तरुणीचा विनयभंग करणार्‍या मौलवीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘विवेक विचारमंच महाराष्ट्र’च्या वतीने निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनावर ऋषिकेश सकनुर, अमोल जोशी, सचिन रासवे, मुकुंद चौधरी, उद्धव भंडे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.