संख्याबळ हेही बळच आहे !

स्वातंत्र्यवीर सावरकर

उत्तर प्रदेशमध्ये अमर गौतम नावाच्या धर्मांतरित (बाटग्या) मुसलमान व्यक्तीस ‘मुकबधीर हिंदु मुले आणि इतर यांचे’ इस्लाममध्ये धर्मांतर केल्याच्या प्रकरणी नुकतीच अटक झाली. माझ्याशी बोलतांना एका हिंदूने प्रश्न केला की, ‘मुकबधिरांचे धर्मांतर केल्याचा एवढा बाऊ करण्याचे कारण काय ? आपण जे थोडेबहुत अजून हिंदू आहोत, त्यांचीच उत्तम प्रकारे उन्नत्ती करू म्हणजे झाले’ हे महाशय विसरतात की, ‘पाकिस्तान’ची निर्मिती मुसलमानांच्या संख्याबळाच्या आधारानेच झाली. एक हिंदू जेव्हा धर्मांतरित होतो, तेव्हा हिंदूंची संख्या एकाने अल्प होतेच होते, त्या व्यतिरिक्त इतर धर्मियांची संख्या एकाने वाढते आणि अशा धर्मांतरितांकडूनच ‘राष्ट्रांतराचा’ विचार दृढ होतो.

हिंदूसंघटक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर हे ९४ वर्षांपूर्वी १७ फेब्रुवारी १९२७ या दिवशी ‘श्रद्धानंद’मध्ये लिहिलेल्या लेखात म्हणतात, ‘विपक्षीय लोक (हिंदूंच्या व्यतिरिक्त) संख्याबळ वाढवण्याचे आटोकाट प्रयत्न करीत असता, हिंदूस तेवढे सांगणे की, ‘संख्येत काय आहे ? बाटू द्या ! लुटू द्या ! तुम्ही आपले जे उरतील त्यांचे गुणबळ वाढवा म्हणजे झाले !… प्रथमत: हे ध्यानात ठेविले पाहिजे की, जर समाज असेल, तरच त्यांच्यात गुणबळ वाढविण्याचा प्रश्न उद्भवतो. परधर्मीयांच्या सहस्र वर्षे चालत आलेल्या आणि प्रतिकार न केला तर आणखी अनेक वर्षे चालू पाहणार्‍या प्रबळ दंडेलीने एकेक करून सर्व हिंदू परधर्मात लुटून नेले गेले, तर मग गुणबळ वाढविणार तरी कोणामध्ये ? गुणाला अधिष्ठानच जर नाहीसे झाले, जर हिंदु समाजच उरला नाही, तर उन्नती तरी कोणाची करावयाची.

– श्री. श्रीकांत ताम्हनकर, पुणे