१२ वीचा निकाल ३१ जुलैपर्यंत घोषित करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

येत्या १० दिवसांत अंतर्गत मूल्यांकन योजना बनवा !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – देशातील सर्व राज्यांनी ३१ जुलैपर्यंत १२ वीचा निकाल घोषित करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. १२ वीच्या परीक्षा रहित करण्यात आल्याच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा आदेश दिला. तसेच येत्या १० दिवसांत अंतर्गत मूल्यांकन योजना सिद्ध करावी, असा आदेशही देण्यात आला आहे.