साधकांना निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य करणारा ‘निर्विचार’ हा जप ऐकून काय जाणवते ? हे कळवा !

‘१४ मे २०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘निर्विचार’ या नामजपाच्या संदर्भातील चौकट प्रकाशित करून त्याची प्रथम ओळख करून देण्यात आली होती. या चौकटीत या जपाचे महत्त्व आणि तो कुणी करावा, याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले होते. ‘निर्विचार’ हा गुरुकृपायोगातील सर्वांत शेवटचा नामजप सांगण्यात आला आहे. हा जप केल्याने साधकाला अंतिम स्तराच्या नामजपाची तोंडओळख व्हावी, यासाठी हा जप सांगितला आहे.

‘निर्विचार’ जप कसा म्हणावा ?’ याविषयीची योग्य पद्धत कळावी, यासाठी ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ यांच्या ध्वनीमुद्रित जपाची (‘ऑडिओ’ची) ‘लिंक’ खाली दिलेल्या चौकटीत दिली आहे. हा जप ऐकून काय जाणवते ? यामध्ये शक्ती, भाव, आनंद, चैतन्य आणि शांती यांपैकी कोणत्या टप्प्यावर जाणवते, हे अनुभवा आणि आलेल्या अनुभूती खाली चौकटीत दिलेल्या ई-मेल पत्त्यावर कळवा.’

‘निर्विचार’ नामजप सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर आणि ‘चैतन्य अ‍ॅप’ (सनातन चैतन्यवाणी)वर उपलब्ध !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार नामजपांची केलेली निर्मिती !

‘कुठलीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्याच्या काळानुसार कुठल्या प्रकारचा नामजप करायचा ?’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून विविध नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप ध्वनीमुद्रित करून सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हा नामजप सनातन संस्थेचे संकेतस्थळ अन् ‘चैतन्य अ‍ॅप’ (सनातन चैतन्यवाणी) या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे.

हे नामजप पुढील लिंकवर उपलब्ध आहेत

https://www.sanatan.org/mr/a/79145.html

‘सनातन चैतन्यवाणी’ अ‍ॅप डाऊनलोड करून नामजप ऐका :

https://www.sanatan.org/Chaitanyavani

चौकटीत दिलेला ‘क्यूआर् कोड स्कॅन’ करून चैतन्यवाणी अ‍ॅप डाऊनलोड करावे.

हे नामजप ऐकतांना आपणांस काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्यास आम्हाला [email protected] या ई-मेल पत्त्यावर अवश्य कळवा.

‘क्यूआर कोड’ (QR Code) म्हणजे काय ?

‘क्यूआर कोड’ (QR Code अर्थात् Quick Response Code) हे ‘बारकोड’प्रमाणेच एक सांकेतिक चिन्ह आहे. हा कोड कोणत्याही संकेतस्थळाच्या मार्गिकेचा अर्थात् ‘वेबसाइट लिंक’चा बनवता येऊ शकतो. हा कोड एकदा एका ‘लिंक’साठी बनवला की, तो त्याच लिंकसाठी वापरता येतो, म्हणजेच प्रत्येक ‘लिंक’साठी वेगळा आणि एकमेव असा असतो. हा कोड आपल्या भ्रमणभाषद्वारे वाचण्यासाठी भ्रमणभाषमधील कॅमेर्‍याचा उपयोग करावा लागतो. नव्याने उपलब्ध होणार्‍या भ्रमणभाषमध्ये याची सुविधा अंतर्भूतच केलेली (बाय डिफॉल्ट) असते. ज्याभ्रमणभाषमध्ये अशी सुविधा अंतर्भूत नसते, त्यांच्यासाठी ‘क्यूआर कोड स्कॅनर’ नावाने अनेक ‘अ‍ॅप्लिकेशन’ ऑनलाइन उपलब्ध असतात. ते ‘गूगल प्ले स्टोअर’द्वारे सहजतेने डाऊनलोड करून घेऊन वापरता येतात.

टीप : ‘गूगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध ‘अ‍ॅप्स’पैकी bit.ly/2PaaflX या मार्गिकेवर असलेल्या ‘Kaspersky QR Code’ या अ‍ॅपचा विचार प्राधान्याने करता येऊ शकतो.